Type Here to Get Search Results !

अखेर महिलांसाठी लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा


 


अखेर महिलांसाठी लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा



मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळानंतर आता अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मुंबईत अखेर सर्व महिलांना सरसकट लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवरात्रोत्सवाचं औचित्य साधच सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला होता. पण, यामध्ये काही अडचणी आल्या  होत्या. अखेर या अडचणी दूर झाल्या असून, महिलांसाठी लोकल प्रवासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 


 


परिणामी सर्व महिला पुन्हा एकदा लोकलनं प्रवास करण्यासाठी निघू शकणार आहेत. खुद्द रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीच याबाबतची घोषणा केली. उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्यादरम्यान आणि सायंकाळी सात नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies