धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार, राम शिंदेची आज उदयनराजेंना भेट!

धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार, राम शिंदेची आज उदयनराजेंना भेट!


धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार, राम शिंदेची आज उदयनराजेंना भेट!


 


सातारा : खासदार उदयनराजे यांनी मराठा आररक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. आता तसाच पुढाकार धनगर आरक्षणसाठीही घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी माजी मंत्री व भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे उदयनराजे यांना भेटणार आहेत. आज शनिवारी राम शिंदे यांची खासदार उदयनराजे यांच्यासोबत भेट निश्चित झाली असल्याचे पदाधिका-यांनी सांगितले आहे. या भेटीमध्ये राम शिंदे हे उदयनराजेंसोबत धनगर आरक्षणासंबंधी चर्चा करतील, असेही पदाधिका-यांनी दिली.छत्रपती उदयनराजे व छत्रपती संभाजीराजे यांनी धनगर आरक्षणासाठीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन राम शिंदे यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे केले होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली होती. आता उदयनराजे यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. राम शिंदे व छत्रपती उदयनराजे यांच्या या संभाव्य भेटीबाबत धनगर समाजामध्येही औत्सुक्य निर्माण झाले आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न असतानाही सतत राजकारण केल जातंय. आजच्या घडीला आण्णासाहेब डांगे, गणपतराव देशमुख, विकास महात्मे, अनिल गोटे, प्रकाश शेंडगे, राम शिंदे, दत्ता भरणे, गोपीचंद पडळकर, रामहरी रूपनवर, रामराव वडकुते, महादेव जानकर, हरिदास बधे, विश्वासराव देवकाते, सुरेश कांबळे, रमेश शेंडगे, आण्णाराव पाटील, आनंदराव पाटील, शिवाजीराव दळणर, शशिकांत तरंगे, राम गावडे, बाळासाहेब गावडे आणि इतर युवानेते ही आहेत. या सर्वांनी आपला इगो बाजूला ठेऊन या प्रश्नावर तोडगा काढणे अपेक्षित आहे, काही नेते सोडल्यास असे होताना दिसत नाही. राज्य शासनाने अध्यादेश काढावा, तर काहीजण विरोध करताहेत, परंतु जर आरक्षण घटनेनेच दिलेले आहे व ते इतर राज्यातील धनगर समाजाला लागू झाले आहे, मग महाराष्ट्र राज्यसरकार राज्यघटनेची अंमलबजावणी का करत नाही?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आज समाजातील अनेक धनगर नेत्यांनी पुढाकार घेतला असून आरक्षण मिळावे यासाठी अहोरात्र झटत आहेत. आज त्याच अनुषंगाने भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments