उपळावे व शिवाजीनगर येथील घटनेची सीआयडी चौकशी करा ; आटपाडी येथील विविध संघटनांनी दिले तहसीलदारांना निवेदन 


 


उपळावे व शिवाजीनगर येथील घटनेची सीआयडी चौकशी करा ; आटपाडी येथील विविध संघटनांनी दिले तहसीलदारांना निवेदन 
माणदेश एक्सप्रेस टीम 


 आटपाडी/धिरज प्रक्षाळे : मौजे उपळावे ता. फलटण जि. पुणे व शिवाजीनगर ता. कडेगाव जि.सांगली या दोन ठिकाणी घडलेल्या घटनेची सीआयडी चौकशी मागणी आटपाडी येथील विविध सामाजिक संघटनांनी केली असून याबाबत आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.


 मौजे उपळावे ता. फलटण, जि. सातारा येथील कु. अक्षदा देविदास अहिवळे या होलार समाजातील अल्पवयीन मुलीची गावातील काही नराधमाने अत्याचार करुन कमरेला दगड बांधून अमानुष हत्या करुन विहिरीत फेकून दिले आहे. माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुदैवी घटना आहे. या घटनेची सखोल सी.आय.डी. चौकशी करुन नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे दुदैवी पिडीत अहिवळे कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे.


 तर शिवाजीनगर ता. कडेगांव जि. सांगली येथील जयसिंग ऐवळे व जयदिप ऐवळे यांच्या घरात घुसून महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना जबर मारहाण केलेली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना जबर शिक्षा झाली पाहिजे. या दोन्ही घटनाची सी.आय.डी. चौकशी झाली पाहिजे वरील दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील तमाम होलार समाज व बहुजनांच्या सर्व संघटना राज्यभर आंदोलन करतील. यासाठी दोन्ही कुटुंबिया त्वरीत न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


 यावेळी आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, रणजित ऐवळे, पिन ऐवळे, गणेश ऐवळे, शैलेश ऐवळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured