तब्बल ७ महिन्यांनी भरला आटपाडी मध्ये शेळ्या मेंढ्यांचा बाजार

तब्बल ७ महिन्यांनी भरला आटपाडी मध्ये शेळ्या मेंढ्यांचा बाजार


 


तब्बल ७ महिन्यांनी भरला आटपाडी मध्ये शेळ्या मेंढ्यांचा बाजारमाणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/धीरज प्रक्षाळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने प्रशासनाने आता लॉकडाऊन मध्ये बरीच शिथीलता दिलेली आहे. मार्च २०१९ मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे देशात सर्वत्र कडक लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर सर्वसामान्य व्यापारी आणि नागरिकांसह सर्व शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला. अशातच गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी अजूनच अडचणीत आला होता. 


 मात्र आता प्रशासनाच्या मंजुरी नंतर आटपाडीमध्ये तब्बल ७ महिन्यांनी शेळ्या मेंढ्यांचा आठवडी बाजार परत एकदा भरायला सुरवात होताना दिसून येत आहे .यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आटपाडीतील शुक्र ओढा अजूनही प्रचंड क्षमतेने भरून वाहत असल्याने शेळ्या मेंढ्यांचा बाजार हा आटपाडी मार्केट यार्ड मध्ये भरलेला आहे. त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज  


Post a comment

0 Comments