Type Here to Get Search Results !

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण


 


न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.


 


डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्विट करत आपल्या सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपण क्वारंटाईन होत असल्याची माहिती दिली होती. 'अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. फर्स्ट लेडी आणि मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.


 


कोरोनाचा फैलाव ज्यावेळी सुरु झाला होता त्यावेळी ट्रम्प अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालत नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की मास्कची मला गरज वाटत नाही.अमेरिकेत स्थिती गंभीरअसल्याचे लक्षात येता  मात्र नंतर त्यांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies