सांगली : उमदीजवळ बोर नदीपात्रात चौदा वर्षीय मुलगा बुडाला

सांगली : उमदीजवळ बोर नदीपात्रात चौदा वर्षीय मुलगा बुडाला


सांगली : उमदीजवळ बोर नदीपात्रात चौदा वर्षीय मुलगा बुडाला  


 


जत : जत तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदीपात्रात पोहण्यास गेलेला चौदा वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना सकाळी आठ वाजता घडली महानतेश कांबळे असे त्या मुलाचे नाव आहे. मित्रांसोबत तो सकाळी नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. मात्र त्याला पोहता येत नव्हते, तसेच नदीपत्रात पाणी जास्त असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.


 दरम्यान, महानतेश अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध घेणे चालू आहे. सांगलीहून पाणबुडी टीम बोलवण्यात आली असून घटनास्थळी सोनलगी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. तसेच उमदी पोलीस, ग्रामस्थ शोध घेत आहेत. परंतु नदीपात्रात पाणी खूप असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments