समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका पुष्पा भावे यांचे निधन 

समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका पुष्पा भावे यांचे निधन 


समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका पुष्पा भावे यांचे निधन मुंबई : सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणाऱ्या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका अशी पुष्पा भावे यांची ओळख.  मुंबईत कामगारांसाठी आवाज उठवणाऱ्या, कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या, गिरणी कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या चळवळीला दिशा देणाऱ्या, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं मुंबईत निधन झालं.


 


 मध्यरात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुष्पा भावे यांचं वय ८१ वर्ष होतं. दीर्घ आजाराने त्यांचं रात्री १२.३० वाजता मुंबईत निधन झालंय. मुंबईतील शिवाजीपार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही पुष्पा भावे यांनी आमूलाग्र काम केलं. स्वतःला अंधश्रद्धांविरोधात झोकून देत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं.


 


 आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू , गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित, रंग नाटकाचे ही पुष्पा भावे यांची पुस्तके आहेत. विद्यार्थीदशेपासूनच पुष्पा भावे विविध चळवळींशी जोडल्या गेलेल्या. भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यांनतर पुष्पा भावे या महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाल्यात. गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, लोकशाहीवादी चळवळी, राष्ट्र सेवा दल अशा अनेक आंदोलन आणि चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता.  


 


डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत.  
मिळालेले पुरस्कार


समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कारअनंतराव भालेराव स्मृति पुरस्कारराजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा 'राजर्षी शाहू पुरस्कार'मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments