मिरज पूर्व भागातील नुकसानग्रस्त भागाची विशाल पाटील यांनी केली पाहणी

मिरज पूर्व भागातील नुकसानग्रस्त भागाची विशाल पाटील यांनी केली पाहणी


 


मिरज पूर्व भागातील नुकसानग्रस्त भागाची विशाल पाटील यांनी केली पाहणी
माणदेश एक्सप्रेस टीम 


 


 सांगली : मिरज पूर्व भागात अवकाळी वादळी वाऱ्याच्या मुसळधार पावसामुळे आणि परतीच्या चक्रीवादळाच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पिकांचे पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे युवा नेते व वसंतदादा पाटील सह. साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यानी दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती घेऊन नुकसान झालेल्या पिकाचे  पाहणी करून पंचनामा सुरू आहे की नाही जाणून घेतले.


 


 शुक्रवार (23) रोजी मिरज पूर्व भागातील वड्डी, ढवळी, नरवाड, बेडग, आरग, लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, खटाव इत्यादी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  नुकसान झालेल्या द्राक्ष, ऊस, कापूस, भाजीपाला, पानमळा इत्यादी पिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कडून पिकांच्या नुकसानीचे माहिती जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यानी शिंदेवाडी, जानरावाडी, लक्ष्मीवाडी, खटाव इत्यादी गावाला स्वंतत्र तलाठी व ग्रामसेवकाची मागणी केली. तर लिंगनूर गावाला स्वंतत्र कृषी सहाय्यकची मागणी करण्यात आले. 


 


 तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे  दोन, तीन गावाचे काम असल्यामूळे कामाचा ताण पडत आहे. प्रत्येक गावात पंचनाम्यासाठी उपस्थित राहू शकत नाही. कृषी अधिकारी तेवढेचे पंचनामा करीत फिरत आहेत. असे मत शेतकऱ्यानी व्यक्त केले. तसेच पंचनामा करणारे कमिटी  कशा प्रकारे पंचनामा करीत आहेत हे शेतकऱ्यांना विचारून पंचनाम्याची माहिती घेतली.


 


 
सर्व शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामा करण्यात यावे असे विशाल पाटील यांनी सांगितले. यावेळी मिरज तालुकाकाँग्रेस अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी पाटील, चेअरमन कैलास पाटील, बाळासो नलवडे, वैभव पाटील, गणेश देसाई, बी.आर. पाटील, अरूण गातारे, राजू सनदी, ईराप्पा नाईक, चंद्रकांत पाटील, कैलास शिंदे, जिनेश्वर पाटील, शिवाजीआण्णा नागरगोजे, उज्वलसिंह शिंदे, संभाजी शिंदे, संभाजी नागरगोजे, राजू माळी, आर.आर.पाटील,परसाप्पा पाटील, शांतीनाथ चौगुले, भिमाणा हणमापुरे, सोमलिंग पुजारी , विशालदादा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल पाटील , उपाध्यक्ष अमोल आदगोंड पाटील ,सचिव श्रीमंत पांढरे, खजिनदार अर्जुन खोत, चिटणीस प्रमोद पाटील, संतोष व्हनांवर, श्रीनाथ देबकर, उदय बरगाले उपस्थित होते.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments