कोरेगाव भीमा प्रकरण :  NIA ची कारवाई , 83 वर्षीय फादर स्टॅन स्वामींना अटक

कोरेगाव भीमा प्रकरण :  NIA ची कारवाई , 83 वर्षीय फादर स्टॅन स्वामींना अटक


 


कोरेगाव भीमा प्रकरण :  NIA ची कारवाई , 83 वर्षीय फादर स्टॅन स्वामींना अटकनवी दिल्ली : महाराष्ट्राच्या भीमा-कोरेगावमध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे.  83 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमधूनअटक करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली. स्वामी यांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतलं जाऊ शकतं किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणलं जाऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, भीमा-कोरेगाव प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत. याआधीही स्वामींची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली होती.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments