राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण


 


राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागणमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.


 


“सोमवारी माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,” असं तटकरे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संदर्भातील माहिती दिली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments