सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न, मात्र सरकारचे धरसोड धोरण कशासाठी? : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न, मात्र सरकारचे धरसोड धोरण कशासाठी? : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 


 


सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न, मात्र सरकारचे धरसोड धोरण कशासाठी? : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई :  राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. मात्र, ही भेट कशाबद्दल आहे. ते सांगितले नव्हते. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्य ठाकरे यांनी लोकांचे अनेक प्रश्न असल्याचे बोलून दाखविले. आज रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. वीज बिलाचा प्रश्न कायम आहे. लोकांची  बिले कमी झालेली नाहीत. हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे. सरकारचे धरसोड धोरण आहे, कोरोना काळात सर्वसामान्यांचे झालेले हाल पाहता राज्य सरकार अजूनही काही ठोस पाऊले उचलत नसल्याचे दिसत आहे. अशी टीका राज्य सरकारवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments