८० हजारफेक अकाऊंट्सचे मालक कोण? जाहीर करा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी 


 


 ८० हजारफेक अकाऊंट्सचे मालक कोण?जाहीर करा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी 


 


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात  मोठा खुलासा करण्यात आला आहे  प्रकरणात फेसबुक आणि ट्विटरवर ८० हजार फेक अकाऊंट उघडण्यात आली. यातून सरकार, मुंबई पोलीस आणि मंत्र्यांची बदनामी करण्यात आली. एवढेच नाही, तर बिहारच्या निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने ही अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या नामवंत मंडळींनी तयार केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.


 


 महेश तपासे  म्हणाले, “या शिवाय, फेसबुक आणि ट्विटरने, या फेक अकाऊंट्सचे मालक कोण?  ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी ॲड्रेसवरून तयार करण्यात आली, याची माहिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी  केली आहे. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला, असा आरोपही तपासे यांनी यावेळी केला.  


 


सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपाने व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, असेही महेश तपासे यांनी सांगितले.   


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured