साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात : आमदार रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात : आमदार रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला


 साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात : आमदार रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटलं होतं.सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला' असं म्हणताना साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात, कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होते...पण आता येत्या GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर टीका केली.   
फडणवीस म्हणाले होते, या सरकारनं कोकणाला काय दिलं? विदर्भाला केवळ १६ कोटी रूपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसतंय तरी कुठे? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झालं. पण सरकार आहे तरी कुठे? मागील वर्षी जे पिकलं ते खरेदी केलं नाही. आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरले होते. आता सगळी कुठे गायब झाले आहेत? असेही फडणवीस म्हणाले होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments