पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या


पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या


 


पुणे : पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे. 


 


दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा आहे. हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक दुश्मनीतून झाला ? याची चौकशी सुरु आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाहीय. पण दीपकच्या जवळच्यांकडे पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.


 


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर खूनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला . डोके पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाल्याचे समजते. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. मोटारसायकलवर नंबर प्लेट नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढला जातो आहे.


 


दरम्यान, या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगतिले की, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. तसेच इतर आर्थिक करणे देखील असल्याचे  दिसून आले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured