दहा महिन्यांच्या बाळाचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करून खून  


दहा महिन्यांच्या बाळाचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करून खून  सातारा : काळज-रामनगर येथील त्रिंबक भगत यांच्या दहा महिन्यांच्या ओमला घरात पाळण्यात झोपलेल्या अवस्थेतूनच अनोळखी 22 ते 25 वर्षांचा पुरुष व महिलेने मंगळवारी (ता. 29) दुपारी साडेचार ते सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून पळवून नेल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. दहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून त्याचा खून झाल्याच्या घटनेमुळे  सातारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. गुरुवारी (ता.1) सकाळी बाळाचा मृतदेह संबंधित कुटुंब राहत असलेल्या 500 मीटर अंतरावरील विहिरीत सापडला. त्यामुळे काळज (ता फलटण) गावात शाेककळा पसरली तसेच काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. दरम्यान या घटनेतील संशियत आरोपीस पाेलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी (ता.1) सकाळी काही जण घरामागे 500 फूट अंतरावर असलेल्या विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीच्या पाण्यावर ओम मृतावस्थेत तरंगताना आढळून आला. त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांचे सहकारी तसेच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. गुरुवारी (ता.1) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण झालेल्या ओमच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी काळज व परिसरात पसरताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रामनगर येथील आदिक भगत यांच्या घर व विहिरीकडे धाव घेतली. ओमची आई व घरातील नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. उपस्थित अनेक महिलांनाही अश्रू आवरता आले नाहीत. मोठ्या संख्येने महिला व नागरिक घटनास्थळी दाखल हाेत होते. गाड्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोणंद पोलिसांनी फलटण-लोणंद रस्त्यावरच वाहने रोखून धरली होती. आमदार दीपक चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देवून भगत कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली हाेती. याच चौकशीदरम्यान काही खास धागेदारे पाेलिसांच्या हाती लागले. त्यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे आणखी जाेमाने वळविली.  पाेलिस तपासात प्राथमिक माहिती अशी समोर आली आहे. ओमच्या आईवर एका युवकाचे एकतर्फी प्रेम होतं. परंतु ओमची आई त्याला प्रतिसाद देत नव्हती. या रागातून संबंधित युवकाने ओमचे अपहरण करुन त्याचा खून केला. एकतर्फी प्रेमातून युवकाने ओमचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी संशियत युवकास ताब्यात घेतले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured