राज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन 

राज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन 


 


राज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन मुंबई : राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली होती. वाढीव वीज बिलाबाबत काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवेळी याप्रकरणी तुम्ही शरद पवारांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला होता. राज्यपालांच्या या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून वाढीव वीज बिलांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता अशी माहिती स्व:त शरद पवार यांनीच दिली आहेयाबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की, राज ठाकरे यांचा मला फोन आला होता. मात्र भेटण्याबाबत ठरलेले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. राज्यपालांनी फोन करायला सांगितल्याने मी फोन केल्याचं राज ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिलं आली आहेत. यातून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. राज ठाकरे यांनीही काल राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि हिच मागणी केली होती.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments