अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते पण.... ; एकनाथ खडसे यांचे पुन्हा भाजपवर आरोप 


 


 


अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते पण.... ; एकनाथ खडसे यांचे पुन्हा भाजपवर आरोप 
माणदेश एक्सप्रेस टीम 


 


 मुंबई : भाजपा सोडले नसते तर माझा अडवाणी, वाजपेयी केला असता असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला. ते मुक्ताईनगरमध्ये पोहोचल्यावर खडसे यांनी हे आरोप केले. 


 


 राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर खडसे हे मुक्ताईनगरला आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. परंतू शरद पवारांमुळे मी पुन्हा राजकारणात आलो, असे खडसे म्हणाले. 


 


 अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते. पण मी गप्प बसणारा नव्हतो. मी सन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती. मार्गदर्शन करावे असं ते म्हणत होते.  मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured