एसटी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे हल्लाबोल आंदोलन

एसटी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे हल्लाबोल आंदोलन


 


एसटी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे हल्लाबोल आंदोलन
माणदेश एक्सप्रेस टीम सांगली : मुंबई येथील राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय येथे एसटी कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या शिष्टमंडळ यांनी विविध मागण्याचे निवेदन एसटी महामंडळाचे व्यस्थापकीय उपसंचालक शेखर चणे यांना देण्यात आले. दुष्काळग्रस्त भागाकरिता सन २०१९ ला एसटी महामंडळात चालक व वाहकांची सरकारने भरती केली होती. ३२०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या नावाखाली स्थगिती देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या लेकरांची थट्टा सरकारने थांबवावी, ही स्थगिती शासनाने तत्काळ उठवून प्रशिक्षण सुरू करावे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी काढलेल्या स्थगितीच्या जीआरमुळे मानसिक तणावात जाऊन विशाल हटवार, अमोल माळी या दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस महामंडळ जबाबदार असून ही त्यांची हत्याच आहे. शासनाने तात्काळ या दोन्ही शहीदांना २५ लाखांची मदत तात्काळ देण्यात यावी व यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं.राज्यातील २३६ चालक तथा वाहक मुलीचं अद्यापपर्यंत विद्यावेतन दिलेले नाही. तात्काळ मानधन देण्यात यावे, अतिरिक्ततेच्या नावाखाली राज्यातील विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १६०  कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, अनुकंपा, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक कर्मचारी, चालक वाहक कर्मचाऱ्यांची खंडित केलेली सेवा तात्काळ सुरू करा, कोरोनाच्या काळात पक्षपात व राजकीय हेतूने केलेल्या कर्मचारी यांच्या बदल्या थांबवाव्यात. एसटी महामंडळ रद्द करून याचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करून सर्व कर्मचारी यांना शासनाचे लाभ देण्यात यावे, थकीत कर्मचारी यांचा पगार तत्काळ द्या, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.मागण्या मान्य न झाल्यास ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. असल्याची माहिती अमोल वेटम यांनी दिली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments