"राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की चॉकलेट देऊन" : चंद्रकांत पाटील

"राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की चॉकलेट देऊन" : चंद्रकांत पाटील

"राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की चॉकलेट देऊन" : चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना शरद पवार यांनी, आजचा दिवस हा खूप आनंदाचा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण परिवारातर्फे खडसेंचे स्वागत केले. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की चॉकलेट?" "भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार हे पाहावं लागेल," अशी उत्सुकता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली."नाथाभाऊंच्या नाराजीबाबत अनेकवेळा त्यांच्याशी बोलणं झालं. त्याविषयी काहीतरी मार्ग निघाला असता. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस काय देईल, ते बघूया.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a Comment

0 Comments