Type Here to Get Search Results !

आता आधार कार्डमध्ये बदल करावयाचा असल्यास लागणाऱ्या कागदपत्रांची UIDAI कडून यादी जाहीर  


 


आता आधार कार्डमध्ये बदल करावयाचा असल्यास लागणाऱ्या कागदपत्रांची UIDAI कडून यादी जाहीर  


 


नवी दिल्ली : आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करावयाचा असल्यास डीटेल पुरावा गरजेचा आहे. आधार कार्डधारकांसाठी UIDAIने एक महत्वपूर्ण सूचना दिली आहे. आधार कार्ड सध्याच्या घडीला बँकेत खाते उघडण्यापासून पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वच ठिकाणी गरजेचे असते. अशातच आधार कार्डवर जर चुकीची जन्मतारीख किंवा नाव छापलेले असल्यास आपल्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी अडचणीचे ठरते. 



UIDAI त्याच पार्श्वभूमीवर आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी काही कागदपत्रांची यादी जारी केली आहे. यासंदर्भातील माहिती आधार कार्ड देणारी संस्था UIDAI ने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आधार कार्डवर जन्मतारीख बदलायची असल्यास आपल्याला दिलेली कागदपत्रे आपल्याच नावावर असल्याची खात्री पटवावी लागणार आहे. तसेच ती कागदपत्रे वैध असल्याची खातरजमाही करावी लागणार आहे.
त्याचबरोबर UIDAIच्या माहितीनुसार, आधारमध्ये Proof Of Identity साठी 32 प्रकारच्या कागदपत्रांचा स्वीकार केला जातो. Proof Of relationship साठी 14 कागदपत्रे, DOB साठी 15 आणि Proof of Address (PoA) साठी 45 प्रकारची कागदपत्रे ग्राह्य धरली जातात.


 


DOB Documnets :



1. बर्थ सर्टिफिकेट
2. पासपोर्ट
3. पॅन कार्ड
4. मार्क शीट्स
5. SSLC बुक/सर्टिफिकेट



Proof Of Identity (PoI):



1. पासपोर्ट
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. व्होटर आयडी
5. ड्रायव्हिंग लायसन्स



Proof of Address (PoA):



1. पासपोर्ट
2. बँक स्टेटमेंट
3. पासबुक
4. रेशन कार्ड
5. पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट
6. व्होटर आयडी
7. ड्रायव्हिंग लायसन्स
8. विजेचं बिल
9. पाण्याचं बिल



UIDAI च्या माहितीनुसार स्वतःच्या नावावर ज्या लोकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ते UIDAIच्या माध्यमातून अप्रूव स्टँडर्ड सर्टिफिकेटचा वापर आधार इनरोलमेंट/नाव, पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करण्यासाठी करू शकतात. प्रमाणपत्र गट अ किंवा ब राजपत्रित अधिकारी / ग्रामपंचायत प्रमुख किंवा प्रमुख / खासदार / आमदार / एमएलसी / नगरसेवक / तहसीलदार / मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमुख किंवा अधीक्षक किंवा वॉर्डन किंवा मेट्रॉन / संस्था मान्यताप्राप्त शेल्टर होम किंवा अनाथाश्रमच्या प्रमुखांकडून जारी केले जाणे आवश्यक आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies