अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत 


 


अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत  मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा काही दिवसांपासून रंगू लागली होती. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. उर्मिला यांनी काँग्रेस तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला. उर्मिला यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर शिवसेनेशी जवळीक वाढली होती.  कलाक्षेत्राच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेच्या संघर्षात उर्मिलानं कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळेही उर्मिलाच्या नावाचा शिवसेना विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments