Type Here to Get Search Results !

आटपाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या उद्घाटनावरून सोशल मिडीयात वॉर ; एकमेकावर खालच्या पातळीवर टीका 


आटपाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या उद्घाटनावरून सोशल मिडीयात वॉर ; एकमेकावर खालच्या पातळीवर टीका 
माणदेश एक्सप्रेस टीम 



आटपाडी/धिरज प्रक्षाळे : राजकारण म्हंटल की, आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु काही आरोप ही सभ्यतेच्या पलीकडे जावून केले जातात तेव्हा राजकारणाची पातळी अगदी सुमार दर्जाची होते व टीकेची पातळी खालवली जाते. त्याचा सध्या प्रयत्य आटपाडी तालुक्यातीली जनतेला येत असून विकास कामांच्या उद्घाटना वरून सध्या सोशल मिडीयामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडविला जात आहे.



आटपाडी ग्रामपंचायत च्या १४ व्या वित्त आयोगातून निवडण्यात आलेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक  4 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता पार पडला. यामध्ये वार्ड क्रमांक २ आटपाडी निंबवडे रोड ते हॉटेल ते धांडोरमळा रस्ता मुरमीकरण या कामासह शहरातील एकूण ७ विविध विकास कामांचा शुभारंभ आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख, भारत (तात्या) पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, पंचायत समिती सभापती डॉ. भूमिकाताई प्रताप बेरगळ व उपसभापती रुपेश पाटील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार पाटील, प्रदीप लांडगे, सौ.स्वाती देशमुख, सौ.सुवर्णा माळी, रेखा ऐवळे, संतोष देशमुख, उमाकांत देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. याबाबत आपला “हर्षवर्धन देशमुख युवा पर्व” या फेसबुक पेज वरून सदर उद्घाटनाचे फोटो व बातमी सोशल मिडीयात व्हायरल करण्यात आली.



सदर विकासकामांचे उद्घाटन केल्याची बातमी समजताच “प्रथम लोकनियुक सरपंच आटपाडी” या फेसबुक पेज वरून दुसरी पोस्ट करण्यात आली. यामध्ये आटपाडी उपसरपंच कोळेकर म्हणजे "उथावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या मथळ्याखाली भली मोठी पोस्ट ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे यांच्या नावाने पोस्ट करण्यात आली आहे.



क्वरंनटाईन कालावधी मध्ये संपूर्ण आटपाडी ग्रामपंचायत असताना केवळ स्वता:च्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ग्रामपंचायतीच्या कामाच्या उद्घाटनाचा घाट घालणे म्हणजे आटपाडी उपसरपंच कोळेकर यांचा  "उथावळा नवरा गुडघ्याला बाशिंग" मधला प्रकार आहे.



आटपाडी ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषालीताई धनंजय पाटील यांनी आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील व ॲडव्होकेट धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कामाचा जोरदार धडाका चालु ठेवत आणखीन बरीच कामे आटपाडी ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगातून मंजुर केली असुन लवकरच उर्वरित सर्व कामांची उद्घाटने 2 दिवसात घेण्याची होती. परंतु मागील ४ दिवसांपूर्वीच म्हणजेच दिनांक २९/९/२०२० रोजी आटपाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची मासिक मिटींग सलग 6 तास चाललेली होती. मिटींग चालु असतानाच सरपंच यांना किरकोळ सर्दी व ताप याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याच दिवशी दिनांक २९/०९/२०२० रोजी लगेच कोरोणा चाचणी केली असता सरपंच यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.



मासिक मिटींग सलग ६ तास चाललेली होती व त्या मिटींगला उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थिते  होते. त्यामुळे उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सरपंच यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये असल्याने सर्वांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले व सर्वांनाच 7 दिवस क्वारंनटाईन होण्यास सांगितले होते. परंतु त्यातील ग्रामसेवक व काही ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोणा टेस्ट केली त्यापैकी काही ग्रामपंचायत सदस्य  देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र काहींनी आज अखेर टेस्टच केली नाही. 



सरपंच, ग्रामसेवक व काही सदस्य मात्र नियमानुसार ७ दिवस क्वारंनटाईन झालेले आहेत मात्र काहीजण क्वारंनटाईन चे नियम न पाळता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वाटेल ते करू लागले आहेत. उपसरपंच यांना कोणताही प्रशासकीय अधिकार नसताना तसेच त्यांना कोणताही अधिकार व हक्क प्रदान झाला नसताना असे कृत्य करणे म्हणजे “बिन पगारी फुल अभिकारी" हाच प्रकार म्हणावा लागेल.



म्हणजेच वरील प्रमाणे वस्तुस्थिती असताना सरपंच सौ. वृषालीताई पाटील या नियमानुसार क्वारंनटाईन झाल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन स्वत:च्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी क्वारंनटाईन कालावधीत ग्रामपंचायत विविध विकास कामांचा उद्घाटन करण्याचा घाट म्हणजे कोरोणाला आमंत्रण व “उथावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” असाच प्रकार उपसरपंच यांचा म्हणावा लागेल.



विशेष म्हणजे या ग्रामपंचायतच्या कोण कोणत्या कामांचे टेंडर ओपण झाले आहेत, काही रद्द झाली आहेत याची काहीही माहीती त्यांना नाही. तसेच या पुर्वी कोणकोणत्या कामाची प्रत्यक्ष उद्घाटने होऊन कामे पूर्ण झाली आहेत याचीही काडीमात्र माहीती नसताना ग्रामपंचायतीच्या माहीती नसलेल्या कामांची उद्घाटने करणे म्हणजेच "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग" यामुळे त्यांची गावभर चर्चा खुमासदार चालू होणार आहे.



क्वारंनटाईन कालावधी मध्ये अशा प्रकारची उद्घाटने घेता येणार नाहीत. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. त्यातूनही कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. उपसरपंच यांना विकास कामांचे काहीही देणेघेणे नाही. उपसरपंच हे २ वर्षांमध्ये त्यांच्या नेत्यांकडून विकास कामे आणण्यात अपयशी  ठरले आहेत. उपसरपंच यांनी त्यांच्या प्रत्येक नेत्यांकडून किती विकासकामे आणली? त्याचा हिशोब जनतेला द्यावा. उपसरपंच यांनी त्यांच्या नेत्यांकडून विकास कामे मंजुर करुन खुशाल उद्घाटने करावीत. परंतु क्वारंनटाईन  कालवधी मध्ये असताना अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील तसेच ॲड.धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ. वृषालीताई धनंजय पाटील यांनी विकास कामांचा जो धडाका लावला आहे त्यात उपसरपंच यांनी अजिबात लुडबुड करु नये. असे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे यांनी म्हटले आहे. 



तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा “हर्षवर्धन देशमुख युवा पर्व” या फेसबुक पेज वरून पोस्ट करण्यात आली. यामध्ये सगळे गेले अन आता ह्यो आला. लगा लगा न मला बगा.... सरपंच पती आटपाडीचा म्हण, उपसरपंच ला अधिकार नाहीत. नाव तर कुणाची घेतोय मार्गदर्शनला ज्यांना तालुकाच नाही तर सगळं राज्य ओळखत. दुसऱ्या नंबरच्या कामासाठी. उग लोक हुशार न्हवती. तेव्हा यांचे गावोगावी एजंट शंभर पन्नास रुपयेसाठी त्रास द्यायचे ही यांची ओळख अन संस्कृती आव मात्र व्रतस्थ असल्या सारखा...



प्रशासकीय अधिकार सांगतात सरपंच च्या अनुपस्थिती मध्ये उपसरपंच काम पाहतो. निवडून आलेल्या माणसाला बिन पगारी ठरवण्याचा अधिकार या गुलाल, गबाळ कलेक्शन करणाऱ्यांना समजत तरी का? सगळा जीव टक्केवारीत अडकलेली पिढीजात संस्कृती, आव आणि दिखावा फक्त समाजसेवा करतोय. अमुक करतोय तमुक करतोय.



ज्यांची नाव ऐकल्यावर लोकांना पोलीस स्टेशन, दादागिरी, चुगल्या, काड्या, टेंडर, साइडपट्ट्या खाणारे म्हणून ओळख त्यावरच अखंड गट जिवंत ठेवणारे पाठिंब्या साठी अनेकांचे वाडे उंबरे झिजवणारे लोक कोणत्या तोंडाने बोलावं समजत नाही. साप शेवटी साप च असतो त्याला दुधाचे उपकार काय समजणार ..!!!
अशी पोस्ट करण्यात आली असल्याने यावर लोकांच्या लाईक, कमेंट भरपूर असल्याने सध्या तरी सरपंच व उपसरपंच या दोन गटात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies