बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार 

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार 


 


बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार 


 


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यानंतर ही बैठक झाली. 


 


शिवसेनेने बिहार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. पक्षाने आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला, दोन्ही पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवेसेना नेते संजय राऊत प्रचार करतील, असे सांगण्यात येत आहे.


 बिहार निवडणुकीत एनडीएचे माजी सहयोगी शिवसेनाही दाखल झाले आहे. पक्षाने बिहारमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादीही निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. दोन्ही पक्षांच्या यादीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह सुमारे ६० नेते बिहारमध्ये प्रचारासाठी जातील.


 


शिवसेनेने गुरुवारी २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. शिवसेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील. उद्धव यांच्याशिवाय त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हेही प्रचारकांच्या यादीत आहेत.


 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी भाजपापासून विभक्त झालेल्या आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन करणारी शिवसेना बिहारमधील जवळपास ५० जागांवर निवडणूक लढवेल. सुभाष देसाई, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, रेहुल शेवाळे आणि कृपाल तुमाने या शिवसेनेचे इतर नेते.


 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या वतीने मुख्य प्रचारक असतील असे सांगून राष्ट्रवादीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. याशिवाय नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि फौजिया खान हेही या निवडणुकीच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments