मुंगेर येथे झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेचा भाजपला टोला 


 


मुंगेर येथे झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेचा भाजपला टोला 


 


मुंबई : बिहारमधील मुंगेर येथे झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला असून हा हिंदुत्वावर हल्ला असल्याची टीका केली आहे. मुंगेर हिंसाचारावर भाष्य करत कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा असा उपहासात्मक सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याप्रकरणी विनंती करणार असल्याचा टोला लगावला आहे.


 


“आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपाने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 


  


तसेच आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे असा टोलाही शिवसेनेने  भाजपाला  लगावला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured