आटपाडी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी अडचणीत

आटपाडी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी अडचणीत


 


आटपाडी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी अडचणीत आटपाडी/प्रतिनिधी : एकीकडे राज्यात सर्वत्र कोरानाचे सावट असताना दुसरीकडे परतीच्या पावसाने मात्र हाहाकार माजलेला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय आणि आता परतीच्या पावसाने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. ऊस, भुईमूग, ज्वारी अशी खरीप पिके आणि बागायती केळी, द्राक्षे, भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.


 


शासनाकडून नुकसान भरपाईची कोणतीच खात्री नसल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. आटपाडी तालुक्यातील शेतीला सर्वाधिक परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. पश्चिम भागात शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित होऊन भरपाई कधी मिळणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments