सांगली मधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

सांगली मधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


 


सांगली मधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणसांगली : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सांगली मधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची चिंता वाढली आहे. हे सर्व कर्मचारी मुंबईमध्ये सेवा देऊन परतले होते. एकूण ४२५ कर्मचारी हे बेस्टला मदत करण्यासाठी मुंबईला गेले होते. यापैकी १०६ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान आहे. लॉकडाउनमध्ये बंद असलेली एसटी सेवा राज्य सरकारकडून पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेत जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यासाठी मुभा दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये नऊ डेपोंमधील चालक आणि वाहकांचा समावेश आहे. मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने संपूर्ण ताण बेस्टवर पडत होता. यासाठी राज्यातील मुख्य बस डेपोंमधून बसेस मागवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. सेवेचा कालावधी संपल्यानंतर कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यात परतले असता त्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments