मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त


 


मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त


 


मुंबई : टीआरपी रेटींमध्ये घोटाळा होतोय, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज दिली. माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखणी अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फॉल्स टीआरपी रेटींगसाठी एक टोळी कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


 


ते म्हणाले, “BARC ही संस्था टीआरपी मोजण्याचे काम देशात करते. ही संस्था वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावते, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसांसोबत काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवरून डेटा शेअर करत असल्याचे उघड झाले आहे. हे कामगार लोकांना घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे द्यायचे. जे लोक अशिक्षित आहेत त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल पाहिले जात असल्याची माहिती आहे.


 परमबीर सिंह म्हणाले, आम्ही हंसाच्या माजी कामगाराला अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. दोन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना 9 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी देण्यात आली आहे. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहोत. काही मुंबईत आहेत तर काही मुंबईबाहेर आहेत. ते चॅनेलनुसार पैसे द्यायचे. पकडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले असून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments