सरपंचपुत्राचा एकावर तलवारीने खुनी हल्ला ; ६ जणावर गुन्हा दाखल


 


मंगळवेढा : सरपंचपुत्राने निवडणूकीत विरोधी गटाचे काम केले म्हणून एकास शिवीगाळी करून तलवारीने डोक्यात वार केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील सलगरे खुर्द येथे घटली असून याबाबत राम बाबासाहेब ओलेकर याने दत्ता शामराव सरगर, विद्यमान सरपंच सुरावंती शामराव सरगर, गजेंद्र वसंत सरगर, गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा.सलगर खुर्द ता. मंगळवेढा) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


 


 याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल (२५ ऑक्टोबर) सकाळी ८.३० च्या सुमारास सलगर खुर्द येथील फिर्यादीची बहिण मिराबाई धुळाप्पा करपे हिच्या घरासमोर मिराबाई करपे व भाऊसाहेब लेंगरे यांच्यामध्ये सांडपाण्याच्या कारणावरून भांडणे सुरु होती. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा तानाजी बहिण, भाचा असे समजावून सांगत असताना सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन त्यांना शिविगाळ केली. त्याने हातातील तलवारीने तू विरोधी गटाचे काम करतो. इथे कशाला आला तुला दसरा सण बघू देत नाही, असे म्हणुन फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. 


 


  तसेच त्याच्या सोबतच्या लोकांनी त्याच्या हातातील काठीने फिर्यादीची बहिण मिराबाई भाचा सुरेश व मुकेश यांना मारहाण केली आहे.  फिर्यादीचा मुलगा तानाजी हा भांडणाची शुटींग करीत असताना दुसरा सरपंच पुत्र दत्ता शामराव सरगर याने हातात तलवार घेवुन त्याचा पाठलाग केला. दरम्यान सर्वांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरावर दगडफेक करुन फिर्यादीच्या मोटार सायकलची मोडतोड करुन नुकसान केले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके हे करीत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured