परतीच्या पावसाने आटपाडीकर हैराण


परतीच्या पावसाने आटपाडीकर हैराण आटपाडी : आधी कोरोना आणि आता ह्या परतीच्या पावसाने आटपाडीकर मात्र हैराण झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून पावसाने जणू रौद्ररूप धारण केले आहे असेच काहीस चित्र आटपाडी तालुक्यामध्ये दिसून येत आहे. आटपाडी खर तर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण सध्याच्या या पावसाने मात्र सगळे चित्रच बदलून गेल्याचे दिसून येत आहे.

 

 

 गेले आठ दिवस आटपाडी मध्ये सतत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून आटपाडीचे तलाव संपूर्ण क्षमतेने भरले आहे. शिवाय आटपाडीतील ओढे, नाले आणि विहिरीदेखील भरून रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. आटपाडीतील शुक्र ओढा भरून पुलावरून पाणी वाहत आहे. सुरवातीला मात्र सर्वाना समाधान वाटत होते परंतु आता परिस्थिती “भिक नको पण कुत्रा आवर” अशी काहीशी झाल्याचे दिसून येत आहे. कारण आटपाडी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे.

 

 

 निंबवडे सारख्या किती तरी खेडेगावांमध्ये वीज नसल्याने तेथील नागरिक हताश झालेले आहेत. दिवसभराच्या या सतत पडणाऱ्या पावसाने नागरिक आता वैतागून गेले आहेत. आणखी पुढच्या दोन दिवसात अतिवृष्टी किंवा जास्तीचा पाऊस होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured