राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत

राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत


 


राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊतमुंबई - आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यात एक वर्षांपूर्वी पर्यंत काही फरक नव्हता. आमचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नाही असे राऊतांनी स्पष्ट केले. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बिहार निवडणुक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कंगना राणौत सर्वांवर भाष्य केलंय.


 महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.


 


 ते म्हणाले, राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. शरद पवार आमचे नेते आहेत, राज्यपाल शरद पवारांना  नेता मानतात त्याचे स्वागत करतो, पण राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवे. राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments