जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात मोठा दिलासादायक निर्णय 

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात मोठा दिलासादायक निर्णय 


 


जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात मोठा दिलासादायक निर्णय 


 नवी दिल्ली : कोरोनातून सर्वांची सुटका कधी होणार असा प्रश्न देशातील प्रत्येकाला पडलेला आहे. संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटातून कधी मुक्तता होणार याची वाट सगळेचजण पाहत आहेत. त्यातच जगभरातील अनेक देशात कोरोना प्रतिबंधक लसीवर संशोधन सुरु आहे. त्यात ऑक्सफोर्ड कंपनीसोबतच जॉन्सन अॅण्ड जॉन्सन ही कंपनी देखील आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सफोर्डने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर आता जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीने देखील कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.


 


 जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनच्या बैठकीत एका महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.लवकरच 12 ते 18 वर्ष वयोगटातील तरुणांवर कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी करण्यासंदर्भात विचार करत आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचे डॉ. जेरी सेडॉफ यांनी या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार युवक आणि लहान मुलांवर सुरक्षेचे सर्व निकष डोळ्यासमोर ठेवून कोरोनाच्या लशीची चाचणी करण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे.


 


सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनीने 60 हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही वयोवृद्धांवर करण्यात येत आहे. एका स्वयंसेवकाची प्रकृती या चाचणीदरम्यान बिघडल्यामुळे ही चाचणी काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. पण एका आठवड्यापूर्वी पुन्हा एकदा चाचणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली, असून आता ही कंपनी लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्याच्या विचारात आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments