Type Here to Get Search Results !

वेळापूर येथील कुंटणखान्यावर पोलीसांनी धाड ; १० जणावर कारवाई 


 


वेळापूर येथील कुंटणखान्यावर पोलीसांनी धाड ; १० जणावर कारवाई 
माणदेश एक्सप्रेस टीम 



माळशिरस/प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील यशराज हॉटेल अॅन्ड लॉज या ठिकाणी चालविल्या जात असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकून १० जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात नुतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.



याबाबत अधिक माहिती अशी की, वेळापूर ते पंढरपूर जाणारे रोडवरील यशराज हॉटेल अॅन्ड लॉज या ठिकाणी हॉटेल चालक बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय चालवित असल्याची खात्रीशीर बातमी दिनांक १३/१०/२०२० रोजी नीरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग यांना मिळाल्याने त्यांनी स्वत: व पोनि.गोल्डे, माळशिरस, सपोनि. यमगर, चापोहेकॉ/३१६ ननवरे, चापोना/१७०७ कणसे, मपोना/१७५६ येणपे, सध्या नेम- डिवायएसपी ऑफिस अकलूज, मपोकॉ/२०७४ केंगले, मपोकॉ/२२८३ शिंदे, माळशिरस पो.ठाणे असे सर्वानी मिळून लगेच पंचासमवेत त्या ठिकाणी जावून छापा मारून कारवाई करून वेश्या व्यवसाय करणारे हॉटेल चालक १) सचिन भगवान जाधव वय- २८ वर्षे रा. शेंडेचिंच ता. माळशिरस २) रमेश भगवान मोरे वय- ३० वर्षे रा. वेळापूर ता. माळशिरस यांना तसेच त्यांना मदत करणारे हॉटेल मधील कामगार ३) रमेश बापूसाहेब देशमुख रा.वेळापूर ४) सतिश गणपती गिडडे रा. आटपाडी जि. सांगली ५) ऋषिकेश संजय साठे रा. वेळापूर ६) महेश नारायण पाठक रा. पंढरपूर तसेच ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आलेले ७) अविनाश मधुकर सोरटे रा. अकलूज ८) अमोल विलास सुळ ९) संतोष यशवंत वाघमोडे दोघे रा. साळमुख मळोली ता. माळशिरस १०) ज्ञानेश्वर अर्जुन चव्हाण रा. तांबवे ता. माळशिरस असे एकुण १० जणांना पकडून ताब्यात घेतले आहे. 



 


तेथे वेश्या व्यवसायाकरीता अटकावून ठेवलेल्या दोन महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहामध्ये पाठविले आहे. वर नमुद ताब्यात घेतलेल्या १० जणांविरूध्द पोना/१७९९ महेश मुरलीधर पवार, नातेपुते पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचेविरूध्द वेळापूर पोलीस ठाणेमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६ इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक, तेजस्विनी सातपुते मॅडम,  अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली नीरज राजगुरू, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग , पोनि.व्ही.बी.गोल्डे, माळशिरस पो.ठाणे, सपोनि. एन.बी.यमगर अकलूज पो.ठाणे व त्यांचे वरील स्टाफने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास अकलूज पोलीस ठाणेचे पोनि. भगवान निंबाळकर हे करीत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies