Type Here to Get Search Results !

अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह


 


अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह



मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना  मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.



माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे.तसंच,  राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.



अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. पण, कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली होती. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 22 ऑक्टोबरपासून अजितदादांनी स्वत: क्वारंटाइन केले होते. पण, आज अजित पवारांना आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies