सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम 

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम 


  सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम 


 


सोलापूर : महापुरासारखी अवस्था झालेल्या सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पावसाने विश्रांती देताच नागरिक कुठे सुटकेचा निश्वास घेतेत तोपर्यंत सोमवारी सायंकाळी परत मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसाने सर्वत्र चांगलीच दाणादाण उडवली आहे. या सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 


 


मात्र, अद्यापही शिवारात पिके पाण्याखालीच आहेत. शेतांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आणि पीक वाचविण्यासाठी जिवाचे रान करताना शेतकरी दिसत आहेत. फळबागा आणि भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान करणाऱ्या या पावसामुळे शेतकरी हतबल झाला आहे.  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments