इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरातं लक्ष द्या : भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र सरकारला टोला

इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरातं लक्ष द्या : भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र सरकारला टोला

 इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरातं लक्ष द्या : भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र सरकारला टोला 


 


मुंबई ; हाथरस बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळत असून युपी पोलिसांच्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका होत होती. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते. 
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत आता भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.महाराष्ट्र सरकार सातत्याने युपी सरकारला दोष देत स्वतः च्या राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष नाही करू शकत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे ३/१३ झाले आहेत. ८ महिन्यात पिंपरी चिंचवडला ४४ खून आणि ८७ बलात्कार,नगर ला तर कोविड सेंटरचं पेटवून दिलयं. आपल्या राज्यात कायद्याची भिती,धाक उरलेला नाही जरा इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरातं लक्ष द्या. अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments