हडपसर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार 


 


 


पुणे : हडपसर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांवर हडपसर पोलिस ठाण्यांमध्ये बाल लैंगिक अत्यावर प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोघांना जेरबंद करण्यात आले असून दोघेजण फरार झाले आहेत. 


 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिली होती. तिला कोणीतरी फुस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानूसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध घेतला जात होता.


 


 दरम्यान, पोलिसांना ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर अत्याचार  केला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिस ठाण्याचे तपास पथकांनी शोध सुरु केला.


 


 


  


 गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपीला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत मुलीचे तिच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती रुसून तिच्या मित्राला भेटायला निघाली होती. रस्त्यात यातील एक आरोपी तिला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला मित्राकडे सोडतो असे सांगितले. व  तिला एका ठिकाणी नेऊन तीच्यावर अत्याचार केला. यानंतर संबंधीत तरुणाने त्याच्या दुसर्‍या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. याप्रकारे इतर आणखी दोघा मित्रांनी येऊन तिच्यावर अत्याचार केला. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured