शेतकऱ्यांचे हित जोपासणार सदगुरु श्री.श्री.साखर कारखाना : एन शेषागिरी राव ; नववा गळीत हंगाम सुरु 


 


शेतकऱ्यांचे हित जोपासणार सदगुरु श्री.श्री.साखर कारखाना : एन शेषागिरी राव ; नववा गळीत हंगाम सुरु 
माणदेश एक्सप्रेस टीमम्हसवड/अहमद मुल्ला : सदगुरु श्री.श्री. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी सभासद बांधव व सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांच्या हिताचे कार्य करून सद्गुरू श्री श्री रविशंकर यांनी दिलेला आदर्श गेली आठ वर्षे आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला व यापुढेही असाच प्रयत्न निश्चितपणे राहिल असे आश्वासन साखर चेअरमन एन शेषागिरी राव यांनी दिले. राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या नवव्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.यावेळी श्री गुरु प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज, ह.भ.प.बापूसाहेब देहूकर महाराज, नागपूरचे पोलीस उपायुक्त गजानन  शिवलिंग राजमाने, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी शेजाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. काळे व कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील व संचालक इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


 


  


श्री.एन शेषागिरी राव पुढे म्हणाले की, या साखर कारखान्याच्या प्रारंभीपासून ऊस उत्पादक शेतकरी सभासदा बरोबरच कामकारांचे हित आम्ही गेली आठ वर्षे सातत्याने जोपासले असुन त्यांच्या विस्वासास तडा जाऊ दिला नाही.व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर म्हणाले की, कारखान्याच्या प्रारंभापासून आजपर्यंत सर्व अडी अडचणींचा सामना करून सर्व संचालक मंडळासह ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी, कामगार कर्मचारी तसेच वाहन मालक-चालक भागातील सर्व लोकप्रतिनिधी विविध संस्था यांच्या सहकार्याने संकटावर मात करून या कारखान्याची यशोगाथा निर्माण केलेली आहे आणि ही यशोगाथा दीपस्तंभाप्रमाणे पुढे नेण्याचे काम करण्यासाठी अशाच प्रकारे सहकार्याची गरज आहे.  अध्यक्षीय भाषणात श्री. राजमाने यांनी  कारखान्याच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना साथीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून संचालक श्री व सौ उदय जाधव या उभयतांचे हस्ते व सर्व उपस्थित मान्यवरांच्या चंडी होमास प्रारंभ करून कारखान्याचे सभासद श्री व सौ सुनील मासाळ यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर चंडी होमास प्रारंभ करून काटा पूजनानंतर उपस्थित सर्व मान्यवर व सभासद यांचे हस्ते हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास राजेवाडीचे युवानेते पांडुरंग कोडलकर, आटपाडीचे उद्योगपती जवळेकर तसेच संचालक मोहन बागल, उषाताई मारकड, सतीश दडस, नानासाहेब कर्णवर, कारखान्याचे जनरल मॅनेजर मोहनलाल पाल व सर्व खाते प्रमुख, सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग अनेक ऊस उत्पादक सभासद, गावोगावचे सरपंच,  उपसरपंच उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad