आयडॉलच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक : आज होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले

आयडॉलच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक : आज होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले


 


आयडॉलच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक : आज होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले


 


मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या दूर व  मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाला आहे. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच आज होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणारेत. ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक आढळला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ तक्रार नोंदविणार आहे. यामुळे या परीक्षांमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.


 


दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी या परीक्षेचा दुसरा पेपर होता. तांत्रिक अडचणीमुळे आजचे हे  पेपर पुढे ढकलण्यात आलेत. तसेच बुधवार 7 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 आणि बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम आणि द्वितीय वर्ष बीए आणि बीकॉम, एमसीए सत्र 1 आणि सत्र 2 या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत.


6 आणि 7 ऑक्टोबरच्या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे आयडॉलचे उपकुलसचिव आणि जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी सांगितले. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments