शुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात गेली दोन दिवस झाले पावसाने जोर दिल्याने आटपाडीच्या शुक्र ओढ्यावरील बाजार पटांगण येथील पुल पाण्याखाली गेल्याने पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.आटपाडी तालुक्यात दोन दिवस झाले पाऊस सक्रीय झाला आहे. मागील महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुक्यातील छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून मोठ्या प्रमाणात गाव ओढ्यांना पाणी वाहत आहे. आटपाडीचा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून पाणी सांडव्यावरून वाहत आहे. परंतु आज झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा एखदा आटपाडीच्या शुक्र ओढ्याला पूर आला असून पाणी आटपाडी बाजार पटांगण येथील पुलावरून वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुलावर पाणी बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. याठिकाणी आटपाडी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावण्यात आली आहेत.  

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments