दरोड्यातील फरारी आरोपी जेरबंद ; म्हसवड पोलिसांची कामगिरी

दरोड्यातील फरारी आरोपी जेरबंद ; म्हसवड पोलिसांची कामगिरी


 


 


म्हसवड/प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा  व उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 79/2019 भारतीय दंडविधान संहिता कलम 395, 394, 511 मधील फरार आरोपी नामे भाऊसो अंतु चव्हाण राहणार वाकी हा दिनांक  24 एप्रिल 2019 पासून फरारी होता.


 
 


अनेक ठिकाणी सदर आरोपीचा शोध घेतला परंतु वेळोवेळी तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी विभाग यांचेकडील तपास पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने वरील आरोपीचा शोध घेऊन त्याला आज रोजी सदर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आले असून अटकेची कारवाई चालू आहे.


 


 
सदर कामगिरीमध्ये उपविभागीय कार्यालयाकडील पथकातील कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल बर्गे, चंदनशिवे, वाघमोडे, पवार तसेच म्हसवड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भावीकट्टी व कर्मचारी यांनी भाग घेतला.


 


 


Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments