मराठा समाजाचे खासदार उदयनराजेंकडे लक्ष्य 


 


मराठा समाजाचे खासदार उदयनराजेंकडे लक्ष्य सातारा :  मराठा आरक्षणाबाबत खासदार उदयनराजे भोसले हे स्वतः सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चीची राज्यव्यापी  बैठक आयोजित करणार आहेत. ही बैठक उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथे होईल. उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोघे छत्रपतींच्या घराण्यातील असून कोणीही त्यांच्या कुटुंबात वाद लावू नयेत असे माथाडी कामगारांचे नेते आणि नवी मुंबईत आज (बुधवार) आयोजिलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे  राज्यव्यापी  बैठकीचे आयोजक  नरेंद्र पाटील यांनी नमूद केले.


 पाटील यांच्या माध्यमातून आज नवी मुंबई येथे खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबैठकीस उदयनराजे जाणार नसल्याचे त्यांचे निकटवर्तीयांनी सांगितले. 


 दरम्यान  मराठा समाजाच्या अनेक प्रलंबित  प्रश्नांवर सरकार  गांभीर्याने पाहत नसल्याची खंत सातत्याने मराठा समाजातून व्यक्त होत आहे. त्यातूनच काही दिवसांपुर्वी खासदार उदयनराजेंनी प्रश्न सुटणार नसतील तर पदावर राहणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनी उदयनराजेंसह आमदार शिवेंद्रसिंहराजेंना  साता-यात येऊन  पु्ण्यातील मराठा समाजाच्या बैठकीस येण्याचे  आमंत्रण दिले. त्याबैठकीस दोन्ही राजे गेले नाहीत.


 आता स्वत: उदयनराजेंनी राज्यव्यापी बैठक बोलवली असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना बोलावणार असून या बैठकीत मोर्चा बाबत आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यास अद्याप खासदार उदयनराजे यांच्याकडून अथवा त्यांच्या कार्यालयातून दुजोरा मिळालेला नाही.


 दरम्यान नरेंद्र पाटील म्हणाले की दोन्ही छत्रपतींच्या कुटुंबात कोणीही वाद लावू नये. दोन्ही राजे एकत्रित कार्यक्रमाला येणार आहेत. छत्रपती उदयनराजे यांनी कोल्हापूरची संपत्ती मागितली नाही किंवा छत्रपती संभाजी राजे यांनी सातारची संपत्ती मागितली नाही. शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. आमच्यासाठी दोन्ही राजांचं महत्तवाचं स्थान आहे असे स्पष्ट केले.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured