सांगली शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू

सांगली शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू

 सांगली शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरूसांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल सहा महिने बंद असलेली सांगली शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सोमवारपासून सुरू करण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत ती सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, पन्नाीस टक्के क्षमतेनेच सोमवारी हॉटेल सुरू असल्याचे चित्र होते. 


 हॉटेल्स सुरू करण्यासाठी चालकांनी गेल्या दोन दिवसांपासून तयारी सुरू केली होती. परगावी गेलेल्या कामगारांना बोलावून घेण्यात आले. शिवाय दोन दिवसांत हॉटेलसह परिसरात जंतूनाशकांची फवारणी करण्यात आली. शिवाय हॉटेलमधील सर्व साहित्याचे निर्जंतुकीकरणही करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष लहू भडेकर यांनी सांगितले. दरम्यान, अद्यापही हॉटेल चालकांना कामगारांचा प्रश्नट भेडसावत आहे. तरीही व्यवसाय सुरू करीत असल्याचे प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशा पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.


 


शिवाय कामगारांसह आचारी, स्वच्छता कर्मचार्यां ना सुरक्षेची सर्व साधनेही पुरवण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ग्राहक येण्यापूर्वी तसेच येऊन गेल्यानंतरही संबंधित टेबल, खुर्ची यांचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे चालकांनी सांगितले. शिवाय दर्शनी भागातच सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. कोरोनासह अन्य आजाराची लक्षणे नसणार्यांणनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचेही संघटनेचे अध्यक्ष भडेकर यांनी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments