दिलासादायक : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २० रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असल्याचे चित्र आहे. काल दिनांक १९ रोजी कोरोनाचे ११ रुग्ण आढळून आले होते. तर आज दिनांक २० रोजी कोरोनाचे फक्त ०६ नवे रुग्ण आढळून आहेत.
गावनिहाय रुग्णसंख्या
आटपाडी ०१
य.पा. वाडी ०१
दिघंची ०४
एकूण ०६
आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०६ असून स्त्री रुग्ण ०२ असे एकूण ०६ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज