संभाजीराजे छत्रपती यांच्या सहभागासह मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आक्रोश आंदोलन

संभाजीराजे छत्रपती यांच्या सहभागासह मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आक्रोश आंदोलन


 


संभाजीराजे छत्रपती यांच्या सहभागासह मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आक्रोश आंदोलनमुंबई : आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर सरकारनं कुठलीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण आणि नोकरीतील संधींपासून वंचित राहावं लागत आहे. राज्य सरकारनं आधी १२ हजारांची पोलील भरती जाहीर केली आणि आता ऊर्जा खात्यात 9 हजार पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे.दरम्यान, आरक्षणाअभावी या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला स्थान मिळणार नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारची नोकरभरती करु नये अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल कऱण्यात येणार आहे. या याचिकेबाबत काय तयारी करण्यात आली आहे, याबाबतही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments