सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर टीका करत कंगना पुन्हा एकदा टीकेची धनी 


 


सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर टीका करत कंगना पुन्हा एकदा टीकेची धनी नवी दिल्ली :  कंगना आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहत आहे. आपल्या अपरिपक्व विधानांमुळे ती जनतेचा रोष ओढवून घेताना दिसतेय. शिवसेना आणि कंगना यांच्या वादानंतर आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी तिने असे विधान केलंय ज्यामुळे पुन्हा टीकेची धनी झालीय. सरदार वल्लभ भाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना तिने महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यावर ट्वीट करत टीका केलीय. 


 


 भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांची त्यांच्या जयंतीनिमित्त आठवण काढते. तुम्ही अशी व्यक्ती होतात ज्यांनी आम्हाला आजचा भारत दिला. पण तुम्ही पंतप्रधान पदाचा त्याग करुन महान नेतृत्व आणि दूरदर्शितेला आमच्यापासून दूर केलं. तुमच्या या निर्णयाची आम्हाला खंत आहे असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured