सातारच्या गादीचा अपमान आम्ही सहन करणार नाही, शंभूराज देसाई


 


सातारच्या गादीचा अपमान आम्ही सहन करणार नाही, शंभूराज देसाईमुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. 'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. 


 


प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टिकेसंदर्भात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचे आणि अशा प्रकारची टीका कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले आहे. दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. मराठा समाज शासनाकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करत आहोत. सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता ही टीका सहन करणार नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत आहे. पण 'एक राजा बिनडोक' या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असून मराठा आरक्षण, एमपीएससी परीक्षा, पोलीस भरती, नोकर भरती यासह विविध विषयांवर महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितलं.


 


प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. साताऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत उदयनराजे जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील केली. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर परळीमध्ये सुरू असलेल्या मराठा रोख ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला आहे. प्रकाश आंबेडकरांनी छत्रपतींच्या वारासदारांवर टीका करू नये असे आवाहन केलं आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured