राहुल गांधींनी राजस्थानातील घटनांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश मध्ये नाही: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

राहुल गांधींनी राजस्थानातील घटनांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश मध्ये नाही: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


राहुल गांधींनी राजस्थानातील घटनांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश मध्ये नाही: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


 


दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे. हाथरसच्या घटनेनरून राजकारण करणारे राहुल आणि प्रियांका गांधी राजस्थानला का भेट देत नाहीत? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.


 


विरोधकांनी बारन जिल्ह्यातील घटनेची तुलना हाथरसच्या घटनेशी करू नये,’ अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेला नाही, असे त्यांच्या वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. हाथरसच्या घटनेनरून राहुल आणि प्रियांका गांधी यांना फक्त राजकारण करायचे आहे. ते राजस्थानला का भेट देत नाहीत? तिथे काय घडते आहे, याचे उत्तर गांधी कुटुंबीय देतील का? राहुल गांधींनी राजस्थानातील घटनांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश मध्ये नाही, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments