सांगलीतील खानापूर गावचा विशाल निकम आता दख्खनच्या राजाच्या भूमिकेत 


 


सांगलीतील खानापूर गावचा विशाल निकम आता दख्खनच्या राजाच्या भूमिकेत 


 


सांगली : घाटमाथ्यावरील खानापूर गावचा विशाल निकम आता दख्खनच्या राजाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून कोल्हापुरातील चित्रनगरीत याचे शुटिंग सुरु आहे. लवकरच छोट्या पडद्यावर ही मालिका पाहायला मिळणार असून सांगली जिल्ह्यातील युवकाला यातील "लीड रोल' मिळाला आहे.  दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोनाचे भय न बाळगता कोल्हापुरातील चित्रनगरीत सुरु असलेल्या मालिकेच्या शुटिंगचा सध्या बोलबाला आहे. त्यात जोतिबा देवाची भुमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. तत्पूर्वी जोतिबा मालिकेसाठी कासिंटग सुरु असताना विशालने आपले फोटो पाठवले. खानापूरसारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या विशालने जिम ट्रेनर म्हणून सुरुवात केली. चंदेरी दुनियेचे वेड त्याला होतेच. शालेय शिक्षणानंतर प्रथम पुण्यात आणि नंतर मुंबईतून त्याच्या कलेला बहर आला.नृत्यासह अभिनयाची आवड असल्याने त्याची पावले आपसूकच या इंडस्ट्रिजकडे वळली. "धुमस' या पहिल्या चित्रपटातील त्याच्या भुमिकेचे कौतुक झाले. "साता जन्माच्या गाठी' या मालिकेतही विशालने अक्षया हिंदळकर हिच्यासोबत दमदार अभिनयाचे दर्शन घडवले. त्यानंतरही विशाल जिमट्रेनर तसेच शरीरसौष्ठवपटू म्हणून कार्यरत होता. सुरुवातीपासून व्यायामाची आवड असल्याने त्याने सिक्सर पॅक ऍब्ज बनवले होते. जोतिबा मालिकेसाठी त्याची निवड झाल्यानंतर त्याला 12 किलो वजन कमी करण्यास सांगण्यात आले. काही दिवसातच त्याने वजन घटवले.जोतिबा देवाचे वाहन घोडा. मालिकेतील दृश्यांकसाठी त्याला घोडेस्वारी येणे गरजेचे होते. यापूर्वी घोडेस्वारी न केलेल्या विशालने ती कलाही आठवड्यात आत्मसात केली. दुष्काळी भागातील एक सर्वसाधारण युवक ते दख्खनचा राजा जोतिबाची भुमिका हा त्याचा प्रवास रंजक ठरत आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured