कृषिकन्या नम्रता रणनवरेने सांगितले बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक 

कृषिकन्या नम्रता रणनवरेने सांगितले बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक 


 


कृषिकन्या नम्रता रणनवरेने सांगितले बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक 
माणदेश एक्सप्रेस टीमसदाशिवनगर/प्रतिनिधी :  महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अंतर्गत रत्नाई कृषी महावद्यालमधील कृषीकन्या नम्रता बाळासाहेब रणनवरे हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत माणकी (ता.माळशिरस) येथील शेतकरी वर्गाला बीज प्रक्रियेचे महत्व पटवून दिले.


.
बीज प्रक्रियमुळे होणारी उत्पादनातील वाढ, मातीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरणाची सविस्तर माहिती दिली.  यासाठी विषय शिक्षक डॉ.डी.एस.ठवरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते- पाटील, समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.एकतपूरे, प्रा. एस. आर.अडत, प्रा. डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments