अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका : भाजप नेते  निलेश राणे

अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका : भाजप नेते  निलेश राणे

  


अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका : भाजप नेते निलेश राणेमुंबई:   अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) च्या न्यायवैद्यक विभागाने केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) दिलेल्या अहवालात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे स्पष्टपणे नमूद  केले आहे. यावरून शिवसेनेने  महाराष्ट्र पोलिसांवर  आरोप  लावलेल्यांवर चांगलीच टीका केली आहे. दरम्यान भाजप नेते  निलेश राणे यांनी  शिवसेनेवर  निशाण  साधला आहे.  
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी AIIMSच्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली. त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका, असं म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर हल्ला केला आहे.   
तत्पूर्वी, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे, ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे. 
 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments